Sunday, 22 August 2021

खूप गोंधळ,खूप प्रश्न,आपली मनस्थिती ते मान्य करायाला तयार नसते.चुका प्रत्येकाकडून होत असतात.पण त्यातून शिकण गरजेचं असतं.मला समजलय की स्वतःवर प्रेम करणं खूप मोठी गोष्ट आहे. Actually प्रेम खूप मोठी गोष्ट आहे आणि ते करण्यापेक्षा ती आपल्यात असणंच खूप मोठं आहे.मला विसरणं नाही जमत मग ते कोणीही असो...

#विश्वासवगेरे 💯😍 

06-07-2021

Thursday, 22 August 2019


#coffee

गडद काळ्या रंगांनी वेढलेलं,अगदी तुझ्याच मनासारख त्यात माझ्याबद्दल चा प्रकाश आणि काळोख यांच्यात विविध प्रकारे होणारे बदल हे तुझ्या मनाशी आणि विचारांशी अगदी तुला भांभाऊन सोडतायेत माहिती आहे मला, मी नाही काळजी करत ग पण मला आशा आहे ,मी नाही त्रास करून घेत पण मला विश्वास आहे,तुझ्या या आपुलकी आणि विश्वासामध्ये निर्मळ व सहनशील अस प्रेम आहे ज्याचा आधारावर मी नक्कीच तुझ्या प्रेमात पडलोय 😍😘


#प्रेमरंग


©Akshay Jadhav

Tuesday, 4 June 2019

#सेल्फ_कॉन्फिडन्स

पहिला तुला ते नाकारतील,नंतर हसतील,नंतर विरोध करतील,नंतर विसरतील, पण तू थांबू नको,प्रयत्न सोडू नको,तुझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेव,नंतर तेच आश्चर्यचकित होतील ,नंतर स्वतःच विश्वास होतील आणि शेवटी तुला स्वीकारतील ही नक्कीच 😍

#संघर्ष
©
#Dailyroutine

दररोज नेहमी प्रमाणे थोड gym त्यानंतर एक call करणे,मग त्यानंतर  ठरल्याप्रमाणे bus ची वाट बघत थांबणे, थोडा वैताग येतो पण stop वर जर side ला बघितलं की bus late येण्याच सुद्धा दुःख होत नाही 😍🙊

मग थोड्या वेळाने bus येते तेच लोक ,तीच गर्दी,तोच रोजचाच प्रवास ठरलेला उभारायला सुद्धा जागा नसते तसच जायचं(कारण वेळेवर पोहोचन महत्वाचं असतं),त्यातच conductor चला पुढे चला पुढे चालू असत(मला समजत नाही हा सगळ्यांना पुढं सरकवून ड्राइवर शेजारी बसायला लावतो की काय अस वाटतं असो)

त्यात traffic इतकं की लोकांना इतकी घाई असते की असा कोणता तिर मारणार आहेत माहीत नसतं पण यांना सिग्नल च्या पुढे जायचं असत त्यात कोणतरी एकटं आगाव असतं (ब्रूम ब्रूम 🏍️ करत ) ज्याला कुठे पोहोचायचं असत की नसत माहिती नाही पण त्याची गाडी fast पळत आहे याचा त्याला जास्त आनंद असावा ..

#जॉबgoals

#ये_जिंदगी_गले_लगा_ले 😍❣️😻
©

खूप गोंधळ,खूप प्रश्न,आपली मनस्थिती ते मान्य करायाला तयार नसते.चुका प्रत्येकाकडून होत असतात.पण त्यातून शिकण गरजेचं असतं.मला समजलय की स्वतःवर ...